धन्यवाद

दिवाळी फराळ उत्सव यशस्वी केल्या बद्दल सर्वांचे आभार. माझी इवलीशी परी मानसीच्या सहकार्याचा सर्वात मोठा वाटा. आई व बहिणीच्या सर्व पाककृती नेहमीप्रमाणे कामात आल्याबद्दल त्यांचे हार्दिक धन्यवाद.माझे पती व भाऊ ह्यांनी पण मला अमूल्य मदत केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद. तृप्तीच्या मार्केटिंग स्किल्स मुळे तुमचा प्रतिसाद मिळायला खूप मदत झाली त्यासाठी तीचे विशेष आभार.. माझ्या जिवलग मित्रमैत्रिणीनी उत्सवापूर्वी चाखलेल्या पदार्थाचे कोडकौतुक केल्याचा आधारस्थंभ रोवल्यामुळे त्यांचाही ह्या यशात वाटा. दिवाळी उत्सव हा इथे संपत नसून तो वर्ष भर सुरु राहणार आहे आणि हा असाच यशस्वी कराल अशी आशा आहे. पुढील वर्षी दिवाळी नवीन रंगात, नवीन उत्साहात सर्व मिळून साजरी करूयात. पुढील दिवाळीपूर्वी तिळगुळ घेवून गोड गोड बोलू या.
  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment